Sadabhau Khot and Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

"हिजाब घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपली मुलगी पाठवणार का?”

सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांचे एक व्हायरल होत असलेले वक्तव्य ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांवर ताशेरे ओढले.

सकाळ डिजिटल टीम

सक्तवसुली संचलनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांवर कारवाई करत त्यांच्या सदनिका जप्त केल्या. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देताना म्हणाले, “नुसतं चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल.” त्यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यातच त्यांचं एक वक्तव्य सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, "माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही." मात्र जितेंद्र आव्हाडांनी आपण तसं म्हटले नसल्याचे स्पष्ट सांगितले तरीसुद्धा विरोधक त्यांच्या त्या वक्तव्यावरुन आव्हाडांवर टीका करत आहे.

सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांचे वक्तव्य ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांवर ताशेरे ओढले.

सदाभाऊ खोत म्हणाले, “हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठया होतील. . हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का?”

यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. आव्हाड म्हणाले, “शिवरायांनी धाडसी राजकारण केले शत्रू च्या बायका मुलं मुलिंना छळले नाही.. उगाच त्यांचा कारभार आणि त्यांना बदनाम करू नका तशी शिकवण जिजाऊंची होती. राज्यपाल जेव्हा छत्रपतीं बद्दल बोलले तेव्हा कुठे होतात”

‘माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही’; असे वक्तव्य आपण बोलले नसल्याचे जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट सांगितले. मात्र तरीसुध्दा या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून विरोधक आव्हाडांवर टीका करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

SCROLL FOR NEXT