nana patole and balasaheb thorat 
महाराष्ट्र बातम्या

Congress : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना ; नाना पटोले-बाळासाहेब थोरात वाद मिटला!

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस एकसंघ असल्याचे नाना पटोले म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर या दोघांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा देखील दिला होता. दरम्यान थोरात आणि पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत नाराजींच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. 

नाना पटोले म्हणाले, भाजपकडून देशाची बदनामी करण्याचं काम होत आहे. शिंदे-भाजप सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग होत आहे. मात्र आता हुकुमशाही सहन होणार नाही. काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. काँंग्रेस एकसंघ आहे. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने हे वातावरण निर्माण केले होते.

बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगतिले होते की आमच्यात वाद नाही. भाजपचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फोल ठरल्याचे पटोले म्हणाले. 

पटोले म्हणाले, बाळासाहेब यांनी कोणताही राजीनामा किंवा हायकमांडला पत्र पाठवले नव्हते. माध्यमांनी त्यांच्या भावना दुखवण्याचे काम केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : दररोज ८ शेतकऱ्यांचा मृत्यू! भीषण वास्तव रोखण्यासाठी कृषी आयुक्तांकडून 'टास्क फोर्स'ची घोषणा

Gautam Gambhir: 'काही रात्री खूप एकट्या असतात..'; दिल्लीच्या मैदानात येताच गंभीरचा 'हळवा कोपरा' समोर; BCCI ने शेअर केला Video

अभिनेत्री म्हणून किती पैसे मिळतात आणि ते कुठे खर्च होतात? प्रार्थना बेहेरेने सांगितली आतली गोष्ट

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Crime News : 17 वर्षीय कल्याणीचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हलवला, पोलिसांनी मध्येच थांबवले अंत्यसंस्कार!

SCROLL FOR NEXT