weather update  
महाराष्ट्र बातम्या

Rain Update: जुलै महिन्यात पाऊस कसा असेल? हवामान खात्यानं दिली महत्वाची अपडेट

जूनच्या शेवटच्या आठवड्यात सक्रीय झालेला मॉन्सून कोकण-मुंबईसह उत्तर भारतात चांगला बरसतो आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : यंदाच्या मोसमात मॉन्सून निश्चित वेळेपेक्षा थोडा उशीरानं सुरु झाला. पण जेव्हा सुरु झाला तेव्हापासून साधारण आठवडाभर पाऊस चांगलाच बरसतो आहे. यामुळं मुंबईत आणि उत्तर भारतातील काही शहरांमध्ये पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. पण आता पुढील महिन्यात अर्थात जुलैमध्ये पाऊस कसा असेल याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. (July rainfall is likely to be normal across the country says IMD)

महाराष्ट्रात दरवर्षी साधारण ७ जुलै रोजी मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होते. पण यंदा बिपॉरजॉय चक्रीवादळामुळं मॉन्सूनच्या स्थितीवर परिणाम होऊन तो लांबला. त्यानंतर २३ जून पासून तो राज्यभरात सक्रीय झाला.

त्यानंतर गेल्या सात दिवसात पावसानं चांगला जोर पकडला आहे. मुंबईत तर अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच उत्तर भारतातील काही भागांमध्येही पावसानं मोठं थैमान घातलं आहे. त्यामुळं हवामान खात्यानं शेतकऱ्यांना देखील पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

पण आता जून संपून जुलै महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात मात्र पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशभरात जुलै महिन्यात पाऊस सामान्य असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानुसार या पावसाचं प्रमाणं सरासरी ९४ टक्के ते १०६ टक्के असेल. (Latest Marathi News)

मध्य भारत, दक्षिण व पूर्व भारत, ईशान्य बारत तसेच वायव्य भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर वायव्य, नैऋत्य, अग्नेय तसेच दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT