Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: जसं 'जालियानवाला बाग कांड' तसं'जालना'वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा

मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे पण, उपोषणकर्ते जरांगेंना भेटायला वेळ नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि जालना येथे झालेल्या मराठा आंदोलकांवर लाठीमार यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच जळगावमध्ये सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जालन्यातील प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. उध्दव ठाकरे सभेवेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना सवाल करत, 'येथील कोणते पोलिस आधिकारी आहेत त्यांनी सागावं तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात तुम्ही ताफा घुसवू शकता का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले की, 'असा बेछूट आणि निर्गुण लाठीमार तुम्ही करू शकता का, आंदोलकावर अश्रुधूर तुम्ही सोडू शकता का, हवेत गोळीबार करू शकता का, काय असं त्यांचं चुकलं होतं? आंदोलनाला, उपोषणाला बसलेत. पण पोलिस आले आणि त्यांना दणादणा मारत सुटले. ही परिस्थिती जशी 'जालियानवाला बाग कांड' झालं होतं, तसं हा नवा 'जालनावाला' घडविला आहे, सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

'मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतू मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे', अशी खोचक टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

जालना जिल्ह्यात नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातल्या अंतरवली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. २९ ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरु होतं. मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. त्यानंतर जमलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. याचे पडसाद आजही राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT