Telangana Rashtra Samithi TRS esakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Rashtra Samithi : KCR यांच्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे? महाराष्ट्रात 'या' तीन नेत्यांच्या नावांची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

Bharat Rashtra Samithi: केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची महाराष्ट्रात जबाबदारी कुणाकडे असेल? याविषयी सध्या तर्क लावले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं प्रामुख्यानं समोर येत आहेत.

मागच्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये त्यांची झालेली सभा आणि त्यांनी मांडलेले शेतकऱ्यांचं प्रश्न पाहता महाराष्ट्रात पाय रोवायला ते सज्ज असल्याचं दिसून येत आहे.

नांदेडमध्ये त्यांनी 'अब कि बार किसान सरकार' अशी घोषणा दिली आहे. सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं.

तर त्यांनी काँग्रेसवरही टीका केली, ते म्हणाले मागील ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच कामे केली नाहीत. आत्तापर्यंत सगळे आमदार-खासदार झाले पण आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल.

हेही वाचाः अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

केसीआर यांना महाराष्ट्रात पाय रोवायचे असतील तर इथल्या मातीतला नेता त्यांना सोबत घ्यावा लागले. त्यासाठी आघाडीवर असलेलं नाव राजू शेट्टी यांचं आहे. त्यांची भेटही झालेली आहे.

त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबतही केसीआर यांची भेट झाली. तर प्रकाश आंबेडकर हे तेलंगणा विधानसभेच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे केसीआर यांना कोण सोबत करणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT