Santosh Bangar Uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

संतोष बांगर यांना शह देण्यासाठी सेनेची खेळी; माजी आमदार बांधणार शिवबंधन

दत्ता लवांडे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील आमदार संतोष बांगर गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त आणि रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अगोदर रडून शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांना विरोध करायचा आणि काही दिवसांत शिंदे गटात सामील होण्याचा पराक्रम करायचा अशी टीका त्यांच्यावर झाली होती. त्यानंतर कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे हे आज शिवबंधन बांधणार असून बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून टार्फे यांना मैदानात उतरवणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Former MLA of Kalmanuri Santosh Tarphe Joins BJP Today)

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार असून त्यांच्यासोबत शेतकरी नेते अजित मगर हेही शिवबंधन बांधणार आहेत. हे दोन नेते शिवसेनेत घेऊन संतोष बांगर यांना शह देण्याचा शिवसेनेचा डाव असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान संतोष बांगर हे सध्या शिंदे गटात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर संतोष बांगर यांनी रडत रडत गद्दारी केलेल्या आमदारांना परत येण्याचे अवाहन केले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर वेगवेगल्या स्तरातून टीका करण्यात आली होती.

दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर खिळखिळी झालेल्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून मेळावे, सभा आणि दौरे आयोजित करण्यात येत आहेत. शिवसंवाद यात्रा आणि महाप्रबोधन यात्रेचं आयोजन शिवसेनेकडून करण्यात आलं असून हिंगोलीतील कळमनुरी येथील माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर हे आज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, नेता असाल तर कातडी जाड हवी; सुप्रीम कोर्टानं भाजपलाच झापलं

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला टॉप ऑर्डरवर खेळवा, शुभमन गिलसाठी दुसरी जागा शोधा...; Ravi Shastri यांचा गौतम गंभीरला सल्ला

अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीनं प्रियकरासह मिळून 60 वर्षीय पतीची केली निर्घृण हत्या; ब्लँकेटमध्ये गुंडाळून मृतदेह दिला विहिरीत फेकून

Latest Marathi News Updates : नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे उदय नदीला पूर....

Nagpur News : आजोबाच्या मृत्यूनंतर मुलीच्या मुलाला नोकरी; अनुकंपा तत्त्वावरील दाव्यावर शासनाला आदेश

SCROLL FOR NEXT