bus accidnt.jpg 
महाराष्ट्र बातम्या

दुस-याला वाचविण्याच्या नादात बसला अपघात

अंबादास बेनुस्कर : सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : कल्याणहून साक्रीकडे जाणा-या एसटी बसला (ता.१९) पिंपळनेर जवळील शेलबारी घाटात ट्रकमधून डोकावणार्‍या व्यक्तीस वाचवणाच्या प्रयत्नात, एसटी बस पलटी झाल्याने बसमधील २७ प्रवासी जखमी झालेत.त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्यात आठ व्यक्तींना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शेलबारी घाटात कल्याण साक्री बसचा अपघात;अपघातात २७ जखमी, ८ गंभीर.    नाशिकहून पिंपळनेरकडे येणारी कल्याण साक्री एसटी बसला (ता.१९) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पिंपळनेर जवळील शेलबारी घाटात ट्रक मधुन डोकावणार्‍या व्यक्तीस वाचविण्याचा नादात तसेच रिमझिम पाऊस सुरू असल्याने वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बस रस्त्याच्या खाली उतरली. अचानक बस पलटी झाल्याने बस मधील ५५ पैकी २७ प्रवासी जखमी झालेत.अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड व उपनिरीक्षक भुषण हांडोरे,भाऊसाहेब नर्हे, देवेंद्र वेंदे,सरकार गृपचे ऊदय (बंटी चौरे)यांनी आपल्या सहकारी मुलांना सोबत घेऊन जखमींना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

 ८ जखमींना धुळ्यात पुढील उपचारासाठी पाठवले.

जखमींची नावे - श्रीमती.रंजना शिंदे( वय 59), ललित शिंदे(वय 20) रा.पिंपळनेर,वेडू पेंढारकर(वय 70),वत्सलाबाई पेंढारकर (वय48) रा. सामोडे, भिमाबाई व्यवहारे(वय 70)रा.तहाराबाद,उषा माळी(वय28)धमनार, आबीदा बेलदार (वय48)कासारे,मेहराजबी पठाण (वय55)कल्याण, रंजना सोनवणे (वय 53)ताहाराबाद, इस्माईलखान पठाण (वय60)कल्याण, ईमना कुवर(वय 45)उमरपाटा,गुलाब माळी(वय55),सखुबाई माळी(वय 40),मुळसाबाई कुवर(वय 48) रा. टेंभा,साधु सुळ(वय 50), राजुबाई सुळ(वय 48) रा.दिघावे, अंजली माळी(वय7),आरती माळी(वय48) रा. धमनार, यादव खैरनार (वय 48),हिना खैरनार (वय 15)रा.सामोडे,नाजम शेख(वय26)कासारे, गुफरान खान(वय 6), नमिरा शेख(वय 8),शाईद शेख(वय 6)रा कल्याण, रंजना सोनवणे (वय 50)रा.तहाराबाद,रामचंद्र देसाई (वय43)रा.मांजरी ता. साक्री,व इतरांना पिंपळनेर  रुग्णालयात दाखल केले.

पिंपळनेर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल

बस क्रमांक एमएच २० बीएल.१३४८ वाहक जितेंद्र गवळी (वय ३८)रा.खरडबारी, यांच्या डोक्यावर दुखापत झाली आहे.याबाबत पिंपळनेर पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदविला जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली. करीत आहेत. 'एसटी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण या भागात नेहमीच अपघात होत असतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT