Kamakhya Devi Temple
Kamakhya Devi Temple  esakal
महाराष्ट्र

Kamakhya Devi Temple : मुख्यमंत्र्यांच्या नवसाला पावणाऱ्या कामाख्या देवीची वैशिष्ट्ये माहिती आहेत का? इथे दिला जातो वेगळा प्रसाद

सकाळ डिजिटल टीम

Kamakhya Devi Temple : चार महिन्याआधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. खरंतर जेव्हा ते त्यांच्यासह ४० आमदार घेऊन गुहावटीला गेले. तेव्हा भाजप आणि त्यांचे सरकार स्थापन होऊच शकत नाही, अशी चर्चा रंगली होती. अनेक माध्यमात तर कायदेशीर बाजू, इतिहासातील घटना, कोणी असा बंड केला आणि त्यांचे पुढे काय झाले, यावर चर्चासत्र देखील भरवले. शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन व्हायला केवळ चमत्काराचीच गरज असल्याचेही अनेकांनी म्हटले.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जोर लावला आणि शिंदे गट महाराष्ट्रात आला. एकनाथ शिंदे केवळ राज्यात परतलेच नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. हा चमत्कार आसामच्या गुहावटीतील माता कामाख्याच्या नवसाचा प्रसाद असल्याचे शिंदे गटातील आमदारांनी म्हटले होते. कामाख्या देवी मुख्यमंत्री शिंदे यांना नवसाला पावली. आज ते पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यामूळेच हे मंदिर नेमके कुठे आहे, आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहुयात

माता पार्वतीच्या कलेवराचे ५१ तूकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे एक शक्तिपीठ निर्माण झाल्याची कथा तूम्हाला माहितीच असेल. यापैकीच एक मंदिर आसाममधील गुहावटी या डोंगर दऱ्या आणि निसर्गाने समृद्ध असलेल्या शहरात आहे. या मंदिरातील देवीचे नाव कामाख्या देवी असून ती नवसाला पावणारी मानली जाते. केवळ यामूळेच या देवीच्या मंदिर परीसरात तत्र विद्या करणारे मांत्रिक आणि साधूंची गर्दी असते.

पौराणिक कथा

कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरी नंतर तांत्रिकांची सर्वात महत्वाची देवी आहे. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते. असे मानले जाते. या मंदिराशी जोडलेली पौराणि कथा म्हणजे, जेव्हा राजा दक्ष आपल्या कन्येसोबत भगवान शिवाचा विवाह लावायला तयार नव्हते. या कारणास्तव राजा दक्ष यांनी शिवशंकरांना यज्ञासाठी आमंत्रित देखील केले नाही. हे जेव्हा सतीला हे समजले तेव्हा तिला शिवाचा अपमान सहन झाला नाही. रागाच्या भरात सतीने अग्नीत उडी घेतली.

जेव्हा शिवाला हे कळले तेव्हा ते दुःखी झाले आणि त्यांनी सतीला आपल्या कुशीत घेतले. आणि तांडव करू लागले. जेव्हा देवतांना याची चिंता वाटली तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंकडे याबाबत मदत मागितली. त्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या मृतदेहाचे ५१ तुकडे केले आणि ते शरीराचे अवयव देशाच्या विविध भागात पडले. त्यावेळी माता सतीचा योनी भाग कामाख्यात पडला होता. कामाख्या हे अतिशय शक्तिशाली पीठांपैकी एक आहे.

असे म्हणतात की, ८ व्या शतकात उगम पावलेल्या ५१ शक्तीपीठांपैकी कामाख्या मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. १६ व्या शतकात कूचबिहारचा राजा नर नारायण याने त्याची पुनर्बांधणी केली.

मासिक पाळीत महिलांना बंदी

मानवाचा जन्मावेळी बीज स्त्रीच्या गर्भात फुलते मात्र तो जन्म योनीमार्गातूनच घेतो त्यामूळे देवीच्या या मंदिराला खास महत्त्व आहे. देवीच्या कामाख्या मंदिरात सतीच्या योनीचा भाग पडला होता. त्यामूळे तिथे कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही. तर देवीच्या योनीभागाची पूजा केली जाते. गुहेच्या एका कोपऱ्यात देवीची योनी ठेवलेले आहे. याशिवाय मंदिरात देवीची मूर्ती नाही. मात्र मासिक पाळीच्या काळात महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

नदी होते लाल

कामाख्या मंदिरामागील बाजूस ब्रह्मपुत्रा नदी नदी वाहते. आषाढ महिन्यात या नदीचे पाणी लाल होते. आषाढात देवीला मासिक पाळी येते. त्यामूळे नदी लाल होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या चार गाभाऱ्यांपैकी 'गर्वर्गिहा' हे सतीचे गर्भ असल्याचेही सांगितले जाते.

वेगळा प्रसाद

या मंदिरात खास प्रकारचा प्रसाद मिळतो. प्रसाद म्हणून भक्तांना ओले कापड दिले जाते, त्याला अंबुबाची कापड म्हणतात. असे म्हणतात की, जेव्हा देवीला मासिक पाळी येते तेव्हा तिच्या मूर्तीभोवती पांढरे वस्त्र पसरवले जाते. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा कापड लाल रंगात भिजलेले असतात. नंतर हे कापड प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT