Shivsena Symbol  
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर कपिल सिब्बलांचे न्यायालयात खोचक प्रश्न! म्हणाले, "दुसऱ्या राज्यात बसून..."

सकाळ डिजिटल टीम

Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची असले. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी आहे.  ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात प्रश्नांचा भडीमार केला. 

गटनेता ठरवण्याचा अधिकार पक्षाला आहे की आमदारांना, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.  लोकशाही परंपरेनुसार आमदारांच्या संविधानात राजकीय पक्ष, असं नमुद केलेलं नाही. राज्यपालांच्या अधिकारात कोर्ट हस्तक्षेप करू शकतो का. दुसऱ्या राज्यात बसून शिंदे मुख्य नेते कसे बनले. व्हीप कायद्यानुसार बदलला जाऊ शकतो. 

कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्षाचा इतिहास न्यायालयात वाचून दाखवला. सिब्बल यांनी तथ्याच्या आधारे युक्तिवाद केला. पक्षांतर बंदीच्या कायद्यात बदल आवश्यक असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले. 

शिंदे गटाने पक्षाची बैठक जाणीवपूर्वक टाळली होती. शिंदेगट बैठकीला हजर न राहणे म्हणजे घोडेबाजार झाला, असे सिब्बल म्हणाले. शिंदेंनी दुसऱ्या राज्याची मदत घेतली. शिंदे गटाचे आमदार सुरूवातील गुजरात नंतर आसामला गेले. दुसऱ्या राज्यात बसून शिंदे मुख्य नेते कसे बनले, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

कपिल सिब्बल म्हणाले, अविश्वास प्रस्तावाचा मेल अधिकृत ई-मेलवरून आला नव्हता, असे उपाध्यक्षांनी देखील स्पष्ट केले होते. तसेच निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत. इतरांचे नाहीत. पक्षप्रमुखांच्या निर्णयानुसार गटनेता व्हीपचा निर्णय घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT