Sharad Pawar-Chhagan Bhujbal  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : शरद पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, हे आम्ही कदापि विसरणार नाही

आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावांमध्ये वितृष्ट निर्माण होत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्दावर सर्व पक्षीय तोडगा निघणे गरजेचे असल्याने सर्वांनी एकत्रित यावे समन्वित तोडगा काढावा.

सकाळ वृत्तसेवा

- सचिन शिंदे

कऱ्हाड - आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावांमध्ये वितृष्ट निर्माण होत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्दावर सर्व पक्षीय तोडगा निघणे गरजेचे असल्याने सर्वांनी एकत्रित यावे समन्वित तोडगा काढावा, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिले, ते आम्ही कदापी विसरणार नाही असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मंत्री भुजबळ यांनी आज जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक केले.

ते म्हणाले, जेष्ठ नेते पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याने समाजाला न्याय मिळाला. ती गोष्ट विसरता येणार नाही. त्या अर्थाने शरद पवार नेते आहेत. आम्ही त्यांच्यापासून दुरावलेलो नाह, राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला आहे इतकचं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावांमध्ये सुरू असलेले वातावरण चुकीचं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडणारी फूट योग्य नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक होणे गरजेचे आहे सर्वांच्या मतानुसार कोणत्या मार्गाने जायचे, तेही ठरलं पाहिजे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू झाला.

तो आयोग तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय व्ही पी सिंग यांनी स्वीकारला. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. त्यामध्ये पावणे चारशे जाती आहेत. यापूर्वी २५० जाती होत्या. त्यात वाढ होत आहे. आयोगाच्या शिफारसनंतर ओबीसीच्या जाती वाढत आहेत. त्याबद्दल कोणाला आक्षेप नाही. ओबीसीतून मराठा आरक्षण देणे किती व्यवहार्य आहे, हे तपासण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण सर्वांचे तेच मत आहे. त्यामुळे स्वतंत्र विचारांची गरज आहे मराठा समाज मोठा आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्या मार्गाने जायचं ते ठरवलं पाहिजे.

आम्ही दूर नाही...

मंत्री भुजबळ म्हणाले शरद पवारांपासून आम्ही दूर आहोत, असे वाटत नाही. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला, हे खर आहे. निवडणूक आयोगाकडे वेगवेगळे म्हणणे सादर झाले असले तरी ती कायदेशीर बाब आहे त्याबाबत काही बोलणे योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT