case filed against bjp mla gopichand padalkar over critisizing sharad pawar  
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांवरील टीका पडली महागात, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

कर्जत : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणं महागात पडलं आहे. या प्रकरणी पडळकर यांच्यावर कर्जत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case filed against bjp mla gopichand padalkar over critisizing sharad pawar)

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त झालेल्या कार्यक्रमात शरद पवार आणि पडळकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता. दरम्यान या कार्यक्रमात शरद पवार यांच्याविरोधात पडळकरांनी भाषण केलं होतं. त्या संदर्भात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५०५ (२) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यासंबंधीची तक्रार पोलिसांना देण्यात आली होती. एका समाजाला एका व्यक्तीच्या विरोधात भडकवल्याबद्दल ही तक्रार देण्यात आली आहे

काल चौंडी गावात प्रवेश करण्यापासून पडळकर यांना पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर टीका केली होती. बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर केली होती.

रोहित पवारांनी पडळकर खूप चांगला अभिनय करतात. त्यांनी व्यक्तिगत स्टंट केला. त्यांचे थर्ड ग्रेडचे भाषण झाल्याचा टोला पवार यांनी लगावला होता. तसेच पडळकर यांची गेल्या काही दिवसांची भाषण ऐकली तर दगडफेक करा अशीच होती. त्यामुळे पोलिस कारवाई करणारच, असे देखील रोहित पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘रेड लाइन’ सज्ज; एप्रिलपासून मेट्रो धावणार, २३ किमी मार्गाच्या चाचण्या यशस्वी..

MHADA Mumbai Lottery : मुंबईत स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी ! म्हाडाच्या FCFS सदनिकांसाठी आजपासून अर्ज नोंदणी सुरु, काय आहे प्रक्रिया ?

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT