Almatti Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

Almatti Dam : 'आलमट्टी'तून फक्त 15 हजार क्युसेक विसर्ग; महाराष्ट्राला मोठा फटका, जाणून घ्या कारण

आलमट्टी धरणातून (Almatti Dam) फक्त १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विसर्ग कमी असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे.

बेळगाव : आलमट्टी धरणातून (Almatti Dam) फक्त १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. तर धरणात एक लाख ३८ हजार ४७३ क्सुसेक इतकी आवक होत आहे. यामुळे आलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी महाराष्ट्रातून केली जात आहे.

हा विसर्ग कमी असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. कर्नाटक पाटबंधारे खात्याकडून (Karnataka Irrigation Department) मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २६) आलमट्टी धरणातील एकूण पाणीसाठा ८२.५०९ टीएमसी इतका होता. तर जिवंत पाणीसाठा ६४.८८९ टीएमसी इतका होता.

या धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे विसर्ग वाढविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मंगळवारी (ता. २५) धरणातील विसर्ग ८ हजार ८५७ क्सुसेक इतका होता. यात वाढ करून गुरुवारी १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे.

तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी जलाशयाची पातळी २४७४.७५ फूट इतकी होती. धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी ७ इंचाने खुले केले आहेत.

बुधवारी दिवसभर पाऊस कमी होता. धरणातील आवक कमी झाल्यानंतर दरवाजे बंद केले जाणार आहेत. दोन दिवसांत पाण्याची आवक अधिक झाल्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हिडकल लवकरच भरणार

हिडकल धरणाची क्षमता ५१ टीएमसी आहे. हे धरण बुधवारी निम्मे भरले. या धरणात २६.४९८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच गतवर्षी २६ रोजी ३४ टीएमसी पाणी होते. या धरणात ३३,२५० क्सुसेक इतकी आवक आहे. पाण्याची आवक वाढतच राहिल्यास हे जलाशयही लवकर भरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT