Devendra and Amruta Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Kartiki Ekadashi : अमृता वहिनींनी घातली फुगडी तर फडणवीसही टाळाच्या तालावर थिरकले!

या पूजेआधी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता दोघांनीही वारकऱ्यांशी संवाद साधला.

सकाळ डिजिटल टीम

कार्तिकी एकादशी निमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. रामकृष्ण हरीच्या गजराने भारून गेलेल्या वातावरणात वारकऱ्यांसोबत या दाम्पत्यानेही ताल धरला.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. या पूजेआधी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता दोघांनीही वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तेही विठुनामाच्या गजरात सहभागी झाले. वारकऱ्यांसोबत अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळली तर हे दोघेही टाळाच्या तालावर थिरकले.

यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान औरंगाबादमधल्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड इथले रहिवासी असलेल्या उत्तमराव आणि कलावती साळुंखे या दाम्पत्याला मिळाला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री नामदेव पायरी आणि श्री विठ्ठल सभामंडप, तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT