Nana Patole sakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : बिनविरोध नाहीच! कसबा, चिंचवड निवडणुकीबाबत पटोलेंची मोठी घोषणा; घटकपक्षांबाबतही विधान

संतोष कानडे

पुणेः पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने दोन्ही ठिकाणचे उमेदवार घोषित केलेले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या अद्यापही बैठका सुरु आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी ट्विट करुन मोठं विधान केलं आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी काल भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावललं आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी नाना पटोले यांनी ट्विट करुन सांगितलं की, पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे.

नाना पटोले यांच्या या ट्विटमुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे.आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT