Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

भारत-पाक सामन्यानं प्रश्न सुटणार नाही, भाजपनं काश्मीरवर बोलावं - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही परिस्थिती बदलली नाही.

काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही परिस्थिती बदलली नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. 'काश्मीर' काय आहे हे आधी सरकारनं स्पष्ट करायला हवं? तसेच भारत-पाकिस्तान सामना खेळल्यानं प्रश्न सुटणार नाही, तर भाजपच्या नेत्यांनी काश्मीरवर बोलणं गरजेचं आहे. मोदी पाकिस्तानात जावून केक कापतात. हे भाजपच्या नेत्यांना कसं चालतं, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, भाजप नेत्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरच न बोलता पाकिस्तानवरही बोलावं. देशातील ईडी, सीबीआय पावरफुल्ल आहे, त्यामुळं त्यांना काश्मीरला पाठवा, सोबत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काश्मीरला पाठवलं जावं, असा घणाघातही त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. शेवटी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा एकरी उल्लेख केलेल्या चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला.

ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी उल्लेख केल्याचे समोर आलेय. भाजपचे महाराष्ट्रामधील एक नेते शरद पवारांचा अरे, तुरे असा एकेरी भाषेत करत होते. ही राज्याची परंपरा नाही. आम्ही अशाप्रकारे कधीही नरेंद्र मोदींचा उल्लेख करत नाही. आम्ही अमित शहांविषयी कधीही अशाप्रकारे बोललो नाही. अटलबिहारी वाजपेयी तर आमचे श्रद्धास्थानच होते आणि आहे. आम्ही आजही अडवाणींना मानतो. पण आपल्यापेक्षा वय, अनुभव, संस्कार, संस्कृतीने मोठे असलेले जी लोक आहेत, त्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी लढावी, असा सल्ला वजा इशारा राऊतांनी पाटलांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT