Politics
Politics esakal
महाराष्ट्र

'मलिकांच्या ED प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?'

सकाळ डिजिटल टीम

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तो न्याय नवाब मलिक यांना का नाही? - केशव उपाध्याय

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काल ईडीने अटक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा टोलेबाजी सुरु झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी याप्रकरणात आक्रमक भूमिका घेत भाजपा सुडाचं राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, मुंबईत (Mumbai) बॉम्ब स्फोट करणारा आणि शेकडो मराठी माणसाचा बळी घेणारा दाऊद यांच्याशी संबंधित नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल भाजपाचे केशव उपाध्याय (Keshav Upadhyay) यांनी केला आहे.

यावेळी ते म्हणाले, नवाब मलिक यांच्या ईडी प्रकरणात ठाकरी बाणा दिसणार का? थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊदशी जमीनचा व्यवहार केला असल्याचा मलिक यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात ठेवणे गंभीर आहे. हा एक प्रकारचा देशद्रोह ठरेल. मलिक यांच्या ईडीच्या कारवाई प्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhab Thackeray) ठाकरीबाणा दाखवणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तो न्याय नवाब मलिक यांना का नाही? या देशद्रोह्यांना क्षमा होता कामा नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कणा आहे. त्यामुळे ते तातडीने कारवाई करतील. 1993 मध्ये शिवसेना मुंबईकरांचे रक्षण करण्यासाठी आघाडीवर होती. आता तीच शिवसेना नवाब मलिक यांना वाचवणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

केवळ सत्ता टिकवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी, व्यभिचारी यांना पाठीशी घालताना दिसत आहेत. मात्र आता देशद्रोह्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांना ठाकरी बाणा दाखवा. नवाब मलिक यांनी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप केली हे ईडीने सांगितले आहे. गुन्हेगारी आणि देशद्रोही कारवायांना तीन्ही पक्षांनी समर्थन करणे हे महाराष्ट्रासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT