Ketaki Chitale on Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन केतकी चितळेची पोस्ट; म्हणाली, प्रजासत्ताकदिनी जातीय सर्वेक्षण...

कायम वादग्रस्त विधानं करुन टीकेची धनी ठरत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिची इन्स्टाग्रामवरील पोस्ट वादग्रस्त ठरत आहे. तिने मराठा आरक्षणावरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

संतोष कानडे

मुंबईः कायम वादग्रस्त विधानं करुन टीकेची धनी ठरत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिची इन्स्टाग्रामवरील पोस्ट वादग्रस्त ठरत आहे. तिने मराठा आरक्षणावरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने प्रजासत्ताकदिनी सुरु असलेल्या जातीय सर्वेक्षणावरुन टिपण्णी केली.

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत. याबाबत शुक्रवारी मध्यरात्री किंवा शनिवारी दुपारपर्यंत तोडगा निघू शकतो. दुसरीकडे राज्य शासानाने मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी २३ जानेवारीपासून सर्व्हेक्षणा सुरुवात केली आहे.

केतकी चितळे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, ती महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला प्रश्न विचारतेय. त्यात सदरील महिला कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाबद्दल माहिती देते. त्यावर केतकी चितळे म्हणते, आज गणतंत्र दिवस आहे आणि एका जातीसाठी सर्वेक्षण केलं जातंय.. म्हणजे आपला कायदा सर्वांना समान अधिकार देत नाही.

केतकी चितळे आणि महिला कर्मचाऱ्यामधले संवाद

  • केतकीः तुम्ही मनपावरुन आलायत ना? कास्ट विचारत आहात.. का?

  • महिला कर्मचारीः हो.. आरक्षणसाठी?

  • केतकीः कोणतं आरक्षण? मराठा की...

  • महिला कर्मचारीः मराठा आरक्षण

  • केतकीः आज गणतंत्र दिवसय.. तुमची कास्ट कुठली?

  • महिला कर्मचारीः ओपन, मराठा आहे

  • केतकीः बरं झालं माझ्यावर अॅट्रॉसिटी तरी पडणार नाही

  • महिला कर्मचारीः तुम्ही मराठाच आहात का?

  • केतकीः अजितबात नाही..चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे.

  • केतकीः आज रिपब्लिक डे आहे.. सगळ्यांसाठी कायदा सारखा नाही.. आज प्रजासत्तादिनी हा सर्व्हे सुरु आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT