Ketaki Chitale Court Argument  esakal
महाराष्ट्र बातम्या

केतकी चितळेला दिलासा नाही, कोर्टाने निकाल ठेवला राखून

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात सुनावण्यात आली, दरम्यान केतकीने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी पुर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखूण ठेवला आहे. त्यामुळे केतकीची आजची रात्र कोठडीत जाणार आहे.

शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. या पोस्टनंतर ठाणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत केतकीला ताब्यात घेतलं होतं, यानंतर तिला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

उद्या सकाळी गोरोगाव पोलिस केतकी चितळेचा ताबा घेण्याची शक्यता आहे, दरम्यान शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दात पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कोठडी मध्ये असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे यांना आज ठाणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. याआधी केतकीने न्यायालयात पोस्ट डिलीट करणार नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान मागील पाच दिवसात केतकीवर राज्यभरात १४ गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT