Khalapur Irshalwadi Landslide 
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Irshalwadi Landslide : 22 जणांची सुटका, अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले, उदय सामंत घटनास्थळी

Sandip Kapde

Khalapur Irshalwadi Landslide

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे.

बचावकार्यात सहभागी होण्यासाठी मुंबईहून आणखी 2 टीम रवाना झाल्या आहेत. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे.

रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली आहे. यामधील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 हून अधिक अधिकारी बचाव कार्यात गुंतले आहेत. आम्हाला एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत आहे, असे रायगड पोलिसांनी म्हटले आहे. (Khalapur Irshalwadi Landslide)

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. बचावकार्य सुरू असताना एका एनडीआरएफ जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले दिले आहे.

या घटनेमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. मंत्री उदय सामंत, दादा भुसे हे घटनास्थळी गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT