महाराष्ट्र बातम्या

Khalapur Landslide Rescue Operation: इर्शाळवाडीत बचावकार्याला पुन्हा सुरूवात! 16 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती

Sandip Kapde

Khalapur Landslide Rescue Operation: रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात बुधवारी रात्री भूस्खलन झाले आणि गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. बचाव पथक आणि पोलिसांनी सुरुवातीला गावातील १०० ते १५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

चिखल असल्यामुळे आणि खराब हवामानामुखे काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज पहाटे ५ वाजेपासून पुन्हा बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी तळ ठोकून उभे आहेत. (Khalapur Landslide Rescue Operation)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मातीच्या ढिगाऱ्याखालून १०३ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (latest marathi news)

खराब हवामानामुळे बचाव पथकाला अनेक अडचणी येत आहेत. एनडीआरएफच्या बचाव पथकासह, पनवेल महापालिकेचे बचाव पथक, सिडकोचे मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गटही इर्शाळवाडीत मदत कार्य करत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधानपरिषदेतील नेते विरोधी पक्षाचे अंबादास दानवे, आदिती तटकरे यांनी काल या घटनेचा आढावा घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT