Khashaba Jadhav 
महाराष्ट्र बातम्या

Khashaba Jadhav : इकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपली अन् तिकडं 'गुगल'ची खाशाबांना सलामी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज (15 जानेवारी) ९७ वी जयंती आहे. खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रसह अन्य राज्यातून सातत्याने होत आहे. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. मात्र आज गुगलने डुडलद्वारे खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली.

घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही त्यावर मात करत खाशाबा जाधव यांनी गोळेश्वर (ता. कऱ्हाड) सारख्या ग्रामीण भागामध्ये त्याकाळी कसल्याही सोयीसुविधा नसताना अपार मेहनत करून शरीरयष्टी कमवत कुस्तीचा सराव केला. अनेक संकटांचे टप्पे पार करत त्यांनी परिस्थितीला शरण जाण्यास भाग पाडून देशातून वैयक्तिक क्रीडा प्रकारात देशाच्या ऑलिंपिक खेळाडूंच्या पथकात स्थान पटकावले. त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कास्यपदक जिंकून भारताचा तिरंगा तेथे डौलाने फडकवला.

त्यानंतर कित्येक वर्षे देशाला वैयक्तिक वा सांघिक प्रकारात पदक पटकावता आलेले नव्हते. तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास थरारक आणि थक्क करणार आहे.

खाशाबा जाधव (जन्म : गोळेश्वर-कऱ्हाड, १५ जानेवारी १९२६; मृत्यू : १४ ऑगस्ट १९८४) हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

खाशाबा जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

पुण्यात कालच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. त्यातच आज खाशाबा यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त गुगलने मानवंदना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT