महाराष्ट्र बातम्या

प्रभाकर साईल खोटारडा; किरण गोसावीचा व्हिडिओ आला समोर

सकाळ डिजिटल टीम

पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मी मराठी माणूस आहे असं म्हणत त्याने राज्यातील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच म्हणून उपस्थित असलेल्या किरण गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचा अंगरक्षक प्रभाकर साईलने केलेले आरोप किरण गोसावीने फेटाळून लावले आहेत. तसंच प्रभाकर साइल हा खोटं बोलत असल्याचंही या व्हिडिओमध्ये किरण गोसावीने म्हटलं आहे.

प्रभाकर साईलने सॅम डिसोजासोबत संभाषण कोणाचे झाले, किती पैसे कोणाचे घेतले आहेत, प्रभाकरला गेल्या पाच दिवसात कोणाच्या ऑफर आल्या आहेत, त्याच्या मोबाइलवरून स्पष्ट समजेल. त्याच्या दोन्ही भावाचेही मोबाईल डिटेल्स काढा. माझे आणि प्रभाकरचेसुद्धा चॅट तपासून पाहा असंही गोसावीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी केस हातात घेतल्यास सगळ्यात आधी याची माहिती काढावी. मंत्री किंवा नेते याच्या मागे आहेत. मी मराठी माणूस आहे आणि किमान एका तरी मंत्र्याने किंवा विरोधी पक्षातील नेत्याने माझ्या मागे उभा रहावं. माझ्यावतीने मुंबई पोलिसांकडे तपासासाठी विनंती करावी असंही किरण गोसावी यावेळी म्हणाला.

प्रभाकर साइलचे सीडीआर रिपोर्ट काढावेत. त्याचे २ ऑक्टोबरपासूनचे कॉल डिटेल्स, चॅट तपासावेत. म्हणजे त्याच्या मागे कोण मंत्री आहेत ते समोर येईल. त्याला काय ऑफर आल्या आहेत याचीही माहिती समजेल असं किरण गोसावीने म्हटलं आहे. त्याचे चॅट समोर आल्यास सर्व काही समजेल असंही गोसावी म्हणाला.

किमान एक मंत्री किंवा विरोधी पक्षा नेत्याने माझ्या पाठिशी उभा रहावं. ते नसेल तर किमान मुंबई पोलिसांना विनंती करावी की प्रभाकर साईलचे सीडीआर रिपोर्ट आणि चॅट्स डिटेल्स काढावेत. त्याचे रिपोर्ट येताच समजेल कोणाकडून किती ऑफर आणि कुणाला आहे? असेही किरण गोसावीने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT