Kirit Somaiya on Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: किरीट सोमय्या पुन्हा गरजले! ठाकरे गटावर केला १०० कोटींच्या कोविड घोटाळ्याचा आरोप

किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपा नेते, किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात परतल्याचं दिसुन येत आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर काही दिवस त्यांनी कोणत्याही घडामोडींनी भाष्य केलं नव्हतं.

त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आर्थिक घोटाळे समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.'

7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 90 कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी 10 कोटी रुपये दिले असे मिळून 100 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा सोमय्या यांचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT