Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

तुमचे सुरक्षा कर्मचारी काय करत होते? आयुक्त संजय पांडेंचं केंद्राला पत्र

23 एप्रिल रोजी खार पोलिस स्टेशनबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता.

दत्ता लवांडे

मुंबई : 23 एप्रिल रोजी खार पोलिस स्टेशनबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. सोमय्या यांना केंद्रीय सुरक्षा असताना सुद्धा त्याच्यावर हल्ला झाला होता. पण हल्ल्याच्या वेळी सुरक्षा कर्मचारी काय करत होते याची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सीआयएसएफच्या डीजींना पत्र लिहिले आहे.

राणा दाम्पत्याला भेटायला गेल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली होती. त्यानंंतर आपल्यावर झालेल्या हल्लामुळे आपण पोलिसात तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सदर हल्ल्याप्रकरणी ते दिल्लीतील गृहसचिवांना भेटायला गेले होते. दरम्यान त्यांच्या नावाने पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या नावाने खोटी एफआयआर दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

केंद्रीय सुरक्षा असतानाही माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी "हल्ला केला त्यावेळी केंद्राचे सुरक्षा रक्षक काय करत होते?" असा सवाल करत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या डीजींना पत्र लिहिले आहे.

सोमय्या यांना केंद्रांने सुरक्षा दिली असताना त्यांच्यावर खार पोलिस स्टेशनच्या बाहेर हल्ला झाला आहे. ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशा आशयाचे पत्र मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सीआयएसएफ च्या डीजींना लिहिले आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT