Kirit Somaiya on Jarendeshwar Sugar Factory  E sakal
महाराष्ट्र बातम्या

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांना मिळणार? सोमय्या म्हणतात, ''ED ने...''

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखाना (Jarendeshwar Sugar Factory) शेतकऱ्यांना द्यावा, या मागणीसाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ईडी कार्यालयात गेले होते. काही दिवसांपूर्वी हा कारखाना ईडीने जप्त केला होता. त्यामुळे हा कारखाना शतेकऱ्यांना परत द्यावा, अशी मागणी सोमय्यांनी लावून धरली आहे. आज त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन ईडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. याबाबत स्वतः सोमय्यांनी माहिती दिली आहे.

''बेकायदेशीररित्या लिलाव करून हा कारखाना २०१० साली घेण्यात आला. यासाठी आम्ही तब्बल १२ वर्ष तालुका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. हायकोर्टाच्या निर्णयानंतर हे प्रकरण ईडीकडे गेलं. आता ईडीने चौकशी केली आहे. त्यानंतर आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही सोमय्यांना विनंती केली होती, की हा कारखाना परत मिळवून द्यावा. या मागणीसाठी आम्ही ईडी कार्यालयात आलो होतो'', असं जरंडेश्वर साखर कारखान्याचे सभासद पोपटराव जगदाळे म्हणाले.

ईडीने सहमती दर्शवली -

किरीट सोमय्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप केले होते. हा साखर कारखाना कमी किंमतीत अजित पवारांच्या नातेवाईकांना विकल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला होता. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने चार महिन्यांपूर्वी कारखाना जप्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. त्यामुळे किरीट सोमय्या आज ईडी कार्यालयात गेले होते. कारखाना शेतकऱ्यांना चालविण्यासाठी देण्यात यावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. ''अजित दादांना न्यायालयाने उत्तर दिले आहे. ईडीने हा कारखाना जप्त केला आहे. त्यानंतर न्यायालयानं या जप्तीला दुजोरा दिला. अजित दादांचा काही संबंध नाहीतर मग ते बोलतात कशाला? कारखाना शेतकऱ्यांना परत देण्यासाठी ईडीने सहमती दर्शवली आहे'', असं सोमय्या म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT