महाराष्ट्र बातम्या

संजय पांडेंविरोधात किरीट सोमय्या घेणार राज्यपालांची भेट, सादर करणार पुरावे

या पुराव्यांसहित राज्यपाल कोश्यारींना भेटणार असून तक्रार देणार आहे

सकाळ डिजिटल टीम

या पुराव्यांसहित राज्यपाल कोश्यारींना भेटणार असून तक्रार देणार आहे

हनुमान चालीसा पठण आणि राणा दाम्पत्याला याप्रकरणी केलेली अटक या विषयावर सध्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राणा पती-पत्नीला खार पोलिस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. यावेळी दुखापत झाली असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. यावेळी पोलिस आयुक्त संजय पांडेंवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय पांडे यांनी माझी खोटी सही करून घेतली आहे. ते फोर्जरी असून माझ्या नावाने फेक एफआयआर दाखर करुन घेतला आहे. ठाकरे सरकारने खालच्या पातळीला जाऊन राजकारण केले असल्याने हे सर्व पुरावे राज्यपालांना देणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

या पुराव्यांसहित राज्यपाल कोश्यारींना भेटणार असून तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संजय पांडे त्यांच्या खाजगी जीवनात काही करुदेत, मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, परंतु जर ते मातोश्रीचे पोलिस आयुक्त म्हणून माफियागिरी करणार असतील तर संजय पांडेला सोडणार नाही, असा इशार त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे परिवाराला सोडलं नाही तर संजय पांडे किस खेत की मुली है, असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी राणा दाम्पत्याविषयी विचारले असता ते म्हणाले, शिवसेना नेते संजय राऊत काहीही बोलत असतात. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा ३६ चा आकडा आहे. मात्र ते जगासमोर अश्या पद्धतीनं का दाखवतात हे माहिती नाही. किरीट सोमय्याने ओठाखाली केचप लावला आणि ठाकरे सरकारने महाडेश्वर यांना अटक केली, असं काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष न देता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चालंल आहे याची खबरबात ठेवली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT