Kirit Somaiya Kirit Somaiya
महाराष्ट्र बातम्या

नील, किरीट सोमय्या आणि नीलेश राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी निघालेले किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोली पोलिस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या दिला. यानंतर ते रिसॉर्टकडे जाण्यासाठी पायी निघाले. माझ्या जिवाला काहीही झाल्यास रत्नागिरी आणि दापोली पोलिस जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी पोलिसांना म्हटले होते. काही दूर पायी गेल्यानंतर कायद्याचा भंग केल्यामुळे पोलिसांनी किरीट सोमय्या, नील सोमय्या व नीलेश राणे यांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणल्याची माहिती आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अनिल परब यांच्याविरुद्ध चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी तब्बल तीन तास दापोली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, एसपींनी त्यांची भेट घेतली नाही. तसेच गुन्हाही दाखल करायला तयार नाही आहे. यामुळे किरीट सोमय्या आक्रमक झाले आहे.

तुम्ही रिसॉर्टकडे गेल्यास शिवसेना किंवा एनसीपी कार्यकर्ता दगडफेक करू शकतात, असे पोलिसांनी सांगितल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. रात्रीची वेळ आहे. तुम्ही रिसॉर्टकडे जाऊ नका असे पोलिसांनी सांगितले आहे. तरीही आम्ही जाणार आहोत, असे म्हणत किरीट सोमय्या पायीच निघाले. काही दूर पायी गेल्यानंतर कायद्याचा भंग केल्यामुळे पोलिसांनी किरीट सोमय्या, नील सोमय्या व नीलेश राणे (nilesh Rane) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी अडवले

अनिल परब यांच्या रिसॉर्टकडे जाण्यासाठी पायी निघालेले किरीट सोमय्या व नीलेश राणे यांना पोलिसांनी शंभर मीटर अंतरावर अडवले. त्यांच्या भोवताल पोलिसांनी बॅरेटिंग केले होते. कोणत्याही परिस्थितीत ते समोर जाऊ नये असा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. यावेळी नीलेश राणे यांनी आम्हाला आता का अडवले असा प्रश्न केला. चार ते पाच जणांनाच समोर जाता येतील असे पोलिसांनी सांगितले. यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

अनिल परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागणार आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केली होती. ते आम्हाला रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडणार आहे. सत्यासाठी आंदोलन सुरूच राहणार आहे. आम्ही परत येथे येणार असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Pune Trade : आरबीएसएममध्ये ५७ एमओयूवर सह्या; ३१ कोटी रुपये व्यवहारांची नोंद, रॅम्प उपक्रमांतर्गत रिव्हर्स बायर-सेलर मिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

Latest Marathi News Live Update : उत्सवांच्या काळात अशांत घटकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT