Kirit Somaiya Kirit Somaiya
महाराष्ट्र बातम्या

मारण्याच्या धमक्या देणे हा ठाकरेंचा अधिकार; सोमय्यांचा हल्लाबोल

आयएनएस विक्रांत प्रकरणासंबंधित भाजपाचे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात पुढची सुनावणी होणार आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणासंबंधित भाजपाचे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात पुढची सुनावणी होणार आहे. त्यावेळी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

(Kirit Somaiya On CM Thackeray)

आयएनएस विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी सोमय्या पितापुत्रांवर हायकोर्टात पुढील सुनावणी आज होणार आहे. त्यासंदर्भात सोमय्या बोलताना म्हणाले की, हायकोर्टाने पोलिसांना सहकार्य करा असं आम्हाला सांगितलं होतं. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत आणि केलंही आहे. आम्हाला पोलिसांनी जी जी माहिती विचारली आहे ती माहिती आम्ही दिली आहे. त्यासंदर्भात आज पुढील सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर 12 आरोप केले आहेत त्यापैकी अकरा आरोपामध्ये एका पैशाचाही गैरव्यवहार उद्धव ठाकरेंना सापडला नाही. आमचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार कामाला लागले पण आपण आयुष्यात दमडीचाही भ्रष्टाचार केल्या नसल्याने ते तोंडघशी पडले आहेत. त्यानंतर एका विषयात हायकोर्टाने देखील प्रश्न विचारले आहेत ते आता बाहेर येईल. तुम्ही जे पैसे खाल्ले त्याचं काय झालं या प्रश्नाचे किरीट सोमय्या उत्तर देणार आहे असं ते बोलताना म्हणाले.

तसेच मारण्याच्या धमक्या देणे हा ठाकरे सरकारचा अधिकार आहे. कुणीतरी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला कोर्टाने विचारायचं अन् कागदे मागायची त्याला दिलासा म्हणत नाहीत. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाहीत. असं ते बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT