Kirit somaiya  esakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: 'तो व्हिडिओ खराच पण..' किरीट सोमय्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, अशी असेल पुढील तपासाची दिशा

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर लावले होते महिलांच्या शोषणाचे आरोप

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. व्हायरल झालेला तो आक्षेपार्ह व्हिडिओ किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. परंतु हा आक्षेपार्ह व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप केले होते.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने प्रकाशित केले आहे.

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी एक पेन ड्राईव्ह देखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला होता. या संपुर्ण प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT