Kirit-Somaiya sakal media
महाराष्ट्र बातम्या

क्रांतीशुगर कारखान्यात मागच्या दाराने पैसे आले, सोमय्यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

पारनेर (जि. अहमदनगर) : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील एक-एक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा अहमदनगरकडे वळविला आहे. आज त्यांनी पारनेर येथील क्रांतीशुगर कारखान्याची (kranti sugar factory) पाहणी केली. त्यानंतर या कारखान्यामध्ये मागच्या दाराने पैसा येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

क्रांतीशुगर कारखाना आधी चालू होता. त्यानंतर बंद पडला. तरीही खात्यात पैसा कुठून आला? कारखान्याच्या मालकाच्या स्वतःच्या इन्कम टॅक्सची क्षमता काय. हे तपासले गेले का? याची चौकशी होणं गरजेचं आहे. या कारखान्याचा ईडीने तपास सुरू केला आहे. माझा घोटाळा सिद्ध झाला तर कारखाना बंद पाडू असा अशा धमक्या सोमय्यांना देऊ नका, असेही सोमय्या म्हणाले.

पारनेर साखर कारखाना आजारी कसा पडलाय. या कारखान्याची चारशे एकर जमीन होती. त्या जमीनचं काय झालं? पाहणीनंतर अनेक नवीन मुद्द उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांनी माझ्याकडे समस्या मांडल्या आहेत. त्याबाबतही आता मी ईडीला माहिती देणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

''पारनेर साखर कारखाना विकत घेणारी खासगी क्रांती शुगर अॅण्ड पावर लिमिटेड या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे 32 कोटी रूपयांना कारखाना विकत घेतला. राज्य सहकारी बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती. पारनेर साखर कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले 23 कोटी रूपये उद्योगजक अतुल चोरडीया व अशोक चोरडीया यांच्याकडून उसने घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. तर उर्वरित 9 कोटी रूपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून घेण्यात आले आहेत.'' असे आरोप या कारखान्यावर आहेत. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे. साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चोकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने ईडी कडे केली आहे. सध्या हा कारखाना राष्ट्रवादीचे माजी खासदार विजय नवले यांच्याकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT