Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolhe esakal
महाराष्ट्र बातम्या

Kishor Darade: नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा, किशोर दराडे यांचा दणदणीत विजय

Nashik Teachers Constituency: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी 4 जागांवर झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन ठिकाणी तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एका ठिकाणी यश मिळाले.

आशुतोष मसगौंडे

विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवरा विवेक कोल्हे यांच्यात जोरदार लढत पहायला मिळाली पण अखेर दराडे यांनी विजय मिळवला.

गेल्या चौवीस तासांपासून सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे किशोर दराडे पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पहिला आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर होते. तर अपक्ष विवेक कोल्हे हे दुसऱ्या स्थानी राहिले.

या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक रंगतदार झाली होती.

या निवडणुकीत विजयासाठी 31576 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्याने, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली. दराडे यांना विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या 5100 मतांची आवश्यकता होती. ती पूर्ण केल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

राज्यातील एकूण चार जागांवर विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक झाली. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात बाजी मारली. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा बाजी मारात विजयाची हॅट्ट्रिक साधली. नाशिकमधून किशोर दराडे यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एका जागेवर यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT