Kokan Teachers Constituency Election : कोकणात मविआला धक्का देत कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत, त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केलं. म्हात्रे हे गेल्या निवडणुकीत ६ हजारांहून अधिक मते मिळवले होते. मात्र त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र त्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
म्हात्रे कोण आहेत?
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती.
बदलापूर येथील रहिवासी ज्ञानेश्वर म्हात्रे हे मुख्याध्यापक बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेत संचालक असून पदावर काम करतात. यासोबतच ते अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये ते संचालक देखील आहेत.
हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख असलेले वामन म्हात्रे हे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांच्या कामाला सुरूवात केली.
२०१७ मध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव झाला होता तेव्हा त्यांना शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांना ६ हजार ८८७ इतकी मते मिळाली होती. ते दुसऱ्या स्थानावर होते. या निवडणूकीत २०१७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा विजय झाला होता. त्यावेळी त्यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती.
विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे काय म्हणाले...
कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार म्हात्रे यांनी यावेळी मानले. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखल्याचा दावा म्हात्रे यांच्या बंधूंनी विजयानंतर केला आहे.
पराभूत बाळाराम पाटील यांची प्रतिक्रिया
कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा विचार आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले.
मतदानाची अंतिम आकडेवारी
ज्ञानेश्वर म्हात्रे - 20683 (विजयी उमेदवार भाजप), बाळाराम पाटील -10997 (महाविकास आघाडी), धनाजी पाटील -1490, उस्मान रोहेकर -75, तुषार भालेराव - 90, रमेश देवरुखकर- 36, राजेश सोनावणे - 63, संतोष डामसे -16, नोटा आणि बाद - 1619, एकूण मतदान - 35069, मोजली गेलेली मते - 33450
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.