Indigo Airlines
Indigo Airlines esakal
महाराष्ट्र

Kolhapur : गुजरातला जाणारे प्रवासी नाहीत? कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा बंद होणार

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबादसाठी नागपूर मार्गे नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

उजळाईवाडी : कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावरील विमानसेवा (Kolhapur-Ahmedabad Airlines) एक तारखेपासून पॅसेंजर लोड कमी असल्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे. आणखीन एक मार्ग बंद झाल्यामुळे कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ कमी होणार आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) मंगळवार गुरुवार व शनिवार अशी आठवड्यातील तीन दिवस इंडिगो एअरलाइन्स (Indigo Airlines) या कंपनीची सेवा सुरू आहे. परंतु, अलीकडे पॅसेंजर लोड कमी झाल्याचे कारण देत या मार्गावरील विमानसेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

तर अहमदाबादसाठी नागपूर मार्गे नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर विमानतळावरून अहमदाबादसह देशातील प्रमुख शहरांना विमानसेवा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोल्हापूर विमानतळाचा समावेश उडान योजनेतील असून, सर्वसामान्य प्रवाशांना परवडतील असा तिकीट दर अपेक्षित आहे. तो नसल्यामुळे पॅसेंजर लोड कमी असल्याची चर्चा आहे. याउलट बेळगाव अहमदाबाद विमानाचे तिकीट चार ते पाच हजाराच्या दरम्यान असल्यामुळे त्या विमानसेवेला प्रवाशांचा मिळत असल्याचे बोलले जाते.

कोल्हापूरवरून अहमदाबादसाठी विविध साधनाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. दैनंदिन विमानसेवा व परवडणारे तिकीट दराची आकारणी केल्यास दिवसातून दोन विमानेही चालू शकतील.

-ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT