Kolhapur Girl Assault And Murder Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kolhapur Girl Assault And Murder: बदलापूरनंतर कोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

Kolhapur Girl Assault And Murder Case: नुकतेच बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार केल्याने राज्यातील नागरिकांत संताप असताना आता कोल्हापूरातून एक घक्कादायक घटना समोर आली आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतेच बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार केल्याने राज्यातील नागरिकांत संताप असताना आता कोल्हापूरातून एक घक्कादायक घटना समोर आली आहे.

कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतााना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगी मूळची बिहारची असून, ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडांबरोबर रामनगर परिसरात राहत होती. मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला जात होते.

सकाळपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत काल सायंकाळी तक्रार दाखल केली होती.

यानंतर आज पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने मुलीला शोधून काढले. शियेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात या पीडित मुलीचा मृतदेह पडलेला सापडला.

मुलीचा मृतदेह आता वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबत अधिकचा खुलासा करता येईल असे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री अन् दोन्ही मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरात कार्यक्रम

दरम्यान आज ही घटना उघडकीस आली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम सुरू होता.

या कार्यक्रमानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "या घटनेची आम्ही माहिती घेतली असून कोण्यातील गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल."

याच प्रकरणावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पीडित मुलगी ही मुळची बिहारची आहे. काल तिला तिच्या काकांनी मारल्यानंतर ती घराबाहेर बडली आणि बेपत्ता झाली. त्यानंतर रात्री 10 वाजता ती सापडत नसल्याची तक्रार दाखल झाली. आज सकाळी पोलिसांना एका उसाच्या फडत पीडितेचा मृतदेह सापडला. दरम्यान या प्रकरणात काही संशयीतांना अटक केली असून, पोलीस तपास करत आहे. बिहारच्या या पीडित कुटुंबाला सरकारकडून आम्ही योग्य ती मदत करू. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT