ND Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

झुंझार, लढाऊ व्यक्तीमत्व एन. डी. पाटील

आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी वयाच्या (93) व्या वर्षाही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशा भावना सर्वच स्तरातून उमटल्या.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा अल्पपरिचय

  • संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

  • जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

  • शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

  • अध्यापन कार्य

  • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

राजकीय कार्य

  • १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

  • १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

  • १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

  • १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

  • १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

  • शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

  • शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

  • शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

  • शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

मिळालेले सन्मान / पुरस्कार

  • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

  • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

  • राजर्षी शाहू स्मृती पुरस्कार- २००६

भूषविलेली पदे

  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

  • जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

  • म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

  • कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक – प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT