Kolhapur Lok sabha electopn 2024 shahu maharaj chhatrapati MVA Candidate Maharashtra politics news  
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी डाव टाकला! काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 Latest News : शाहू महाराज छत्रपती... अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकासआघाडीचा उमेदवार घोषित झाला आहे.

Komal Jadhav (कोमल जाधव)

Lok Sabha Election 2024 Latest News : शाहू महाराज छत्रपती... अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकासआघाडीचा उमेदवार घोषित झाला आहे. खरंतर उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात जाऊन न्यू पॅलेस इथे शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. खरंतर कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू होती... अखेर आज महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. न्यू पॅलेस इथे पोहचताच शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांनी गळाभेट घेतली.

पवारांनी डाव टाकला

खरंतर शाहू महाराज छत्रपती यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आलं, ते म्हणजे ऑगस्ट महिन्यात. ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून निर्धार सभा घेतल्या जात होत्या. त्यावेळी पवारांच्या कोल्हापुरातील सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज छत्रपतींना देण्यात आलं होतं आणि त्यांनीही ते स्वीकारलं होतं. त्यामुळे तेव्हापासूनच कोल्हापुरात पवारांनी डाव टाकल्याची चर्चा होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज लढणार ही चर्चा सुरु झाली होती आणि आज त्यावर ठाकरेंनी थेट शिक्कामोर्तबही केलं. कोल्हापुरातून सध्या शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक खासदार आहेत आणि शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यावरुन त्यांनी काही दिवसांपूर्वीच पवारांवर निशाणा साधला होता.

शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्या काळात पवारांच्या विरोधात सदाशिवराव मंडलिक होते. तेवढा मोठा मी नाही. शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीला उभे करण्याचे षडयंत्र त्यांचेच आहे. शाहू महाराज यांची निवडणुकीची इच्छा होती का नाही, हे मला माहिती नाही. पण, शरद पवारांना जुना कोणता तरी राग काढायचा असेल का? याबाबत कल्पना नाही. जर रागच काढायचा असेल, तर जनताही दाखवून देईल अशा शब्दांत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. १६ मार्चला कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तरी, अजूनही महायुतीकडून मात्र उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. संजय मंडलिक मात्र कामाला लागलेत. आणि ते उमेदवारी मिळणार असल्याचा दावाही करताहेत. त्यामुळे आता शाहू महाराजांच्या विरुद्ध कोण लोकसभेच्या रिंगणात येतं हे पाहणं महत्वाचं असेल.

आता परत येऊयात ठाकरे आणि शाहूंच्या भेटीवर...

खरंतर न्यू पॅलेसमधील हॉलमध्ये उद्धव ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी स्वतः श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, युवराज मालोजीराजे, मधुरीमाराजे उपस्थित होत्या मात्र, या भेटीदरम्यान माजी खासदार संभाजीराजे अनुपस्थित असल्याचं दिसून आलं...

संभाजीराजेंची अनुपस्थिती का खुपली?

तर शिवसेनेसोबत संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीवेळचा किस्सा आहे. म्हणजे २०२१ साली राज्यसभा निवडणुकीवेळी माजी खासदार संभाजीराजेंनी शिवसेनेकडे बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी केली होती. तर त्यावर खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासंदर्भात विनंती केली होती. मात्र, आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेणार नसल्याची भूमिका संभाजी राजेंनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना आणि संभाजीराजेंमध्ये मोठा राजकीय संघर्ष देखील झाला होता. पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजेंनी शिवसेनेवर आरोपही केले होते.

त्यामुळे उद्धव ठाकरे- श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या भेटीवेळी संभाजीराजे अनुपस्थित असणं हे अनेकांना खटकलं. याविषयी साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी संभाजीराजेंच्या स्वीय सहाय्यकांकडे विचारणा केली असता ते पूर्वनियोजित दौऱ्यासाठी राधानगरी परिसरात कार्यकर्ता मेळाव्याला गेल्याचे समजले. त्यामुळे एक नक्की आहे की, महाविकासआघाडीनं कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी देऊन मोठा डाव टाकला आहे. तरी, आता महायुतीकडून मात्र अजूनही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तरी, संजयदादा मंडलिकांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराजांसमोर कोण लढाईला उभं राहणार, हे पाहणं महत्वाचं असेल....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT