Rescue teams at the site of the collapsed building slab in Kolhapur’s Phulewadi area.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Kolhapur building slab collapse : कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला ; अनेकजण अडकल्याची भीती

Kolhapur Phulewadi Major Incident : घटनास्थळी मदतकार्य सुरू, इमारतीचा स्लॅब नवीनच सुरू असल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

Mayur Ratnaparkhe

Kolhapur Phulewadi Building slab collapse: कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू होते. दरम्यान साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब कोसळला असून, स्लॅबखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे. इमारतीचा स्लॅबचे काम सुरू होते दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल झाले आहेत.

दरम्यान, या दुर्घटनास्थळी मोठ्यासंख्येने गर्दीही जमली आहे. स्थानिक लोकही मदतकार्यात सहभागी झाले आहे. संध्याकाळनंतर ही घटना घडल्याने, आता मदतकार्यात अंधार आणि त्यात पावसामुळे अडचणी येत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, फायर स्टेशनची ही इमारत असून, तिचे निर्माण कार्य सुरू होते. तर आता या इमारतीच्या मलब्याखाली किमान सात ते आठ मजूर दबले गेले असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT