sharad pawar saroj patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Video : ''झाली का सभा?'' आजारी बहिणीने शरद पवारांना विचारलं; भाऊ-बहिणीच्या नात्याचा व्हिडीओ

संतोष कानडे

कोल्हापूरः काल शरद पवारांची कोल्हापुरात स्वाभिमान सभा संपन्न झाली. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांची उपस्थिती होती. सर्वांनीच अजित पवार गट आणि भाजपवर जोरदार टीकास्र सोडलं. महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज हे पवारांसोबत मंचावर उपस्थित होते.

आज शरद पवारांनी त्यांच्या बहीण सरोज पाटलांची भेट घेतली. आजारी असल्यामुळे सरोज पाटील ह्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शरद पवारांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी सरोज पाटील यांनी कालच्या सभेबद्दलही पवारांना विचारलं.

बहीण-भावाच्या भेटीत काय चर्चा झाली?

शरद पवार आज कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भगिनी सरोज पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. प्रकृती खालावल्यानं सरोज पाटलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल संध्याकाळी पवारांची कोल्हापुरातील दसरा चौकात सभा झाली. सभेनंतर सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर पवार हे बहिणीला भेटायला रुग्णालयात गेले. “कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील” असं म्हणत त्यांनी बहिणीला सल्ला दिला तर सरोज पाटलांनी पवारांकडे सभेविषयी विचारणा केली.

सरोज पाटील यांनी यावेळी उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाचं कौतुक केलं. शिवाय उपस्थित अनेकांची ओळख करुन दिली. भाऊ भेटायला आल्याने बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहिला नव्हता. यावेळी रुग्णालय स्टाफ आणि सरोज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT