Scientist Dr. Raghunath Mashelkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Raghunath Mashelkar: कोकणी माणसानं मनानं अन् धनानंही श्रीमंत व्हायला हवं; प्रकल्पांवरुन माशेलकरांचा सल्ला

कोकणात प्रस्तावीत अणुऊर्जा आणि रिफायनरी प्रकल्पांना सातत्यानं विरोध होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सिंधुदुर्ग : कोकणात प्रस्तावीत अणुऊर्जा आणि रिफायनरी प्रकल्पांना सातत्यानं विरोध होत आहे. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी कोकणवासियांना महत्वाचा सल्ला दिला आहे. कोकणी माणसानं मानानं अन् धनानंही श्रीमंत व्हायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्ग इथं एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. (Konkani man should become rich in mind and money also says Raghunath Mashelkar)

माशेलकर म्हणाले, "स्पष्ट सांगायचं म्हणजे अणुऊर्जेशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याचं कारण मी सांगतो की, आपण जेव्हा अॅडव्हान्स होणार आहोत. त्यासाठी ऊर्जेची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा प्रकारच्या बायोऊर्जा घेतल्या तरी देखील ऊर्जेच्या गरजेबाबत मोठा गॅप आहे. डॉ. अनिल काकोडकर यांनी परवाच भाषणात सांगितलं की, हा ऊर्जेचा मोठा गॅप आपल्याकडं आहे. त्यामुळं अणुऊर्जा आल्याशिवाय आता पर्याय नाही.

आता अणुऊर्जेचं काय झालं आहे की, यामध्ये छोटे मॉडरेट रिअॅक्टर आले आहेत. हे मॉडरेट रिअॅक्टर अगदी सुरक्षित आहेत, ते छोट्या जागेत असतात त्यांना जास्त जागा लागत नाही. सौर ऊर्जा असली तरी रात्री ती मिळणार नाही पण अणुऊर्जा आपल्याला साठवून ठेवता येईल. त्यामुळं त्याचं कॉम्बिनेशन अगदी योग्य आहे. यावर आता चर्चा चालू आहे विचार चालू आहे.

त्यामुळं अशा प्रकल्पांना विरोध होतो तेव्हा सरकारनं फक्त एक करायला पाहिजे की जनतेशी संवाद साधला पाहिजे. त्यांना हे समजून सांगितलं पाहिजे की हे किती सुरक्षित आहे. भारतात इतकी वर्षे झाली अद्याप एकही अपघात झालेला नाही. आपल्याकडं नवा कुठलाही प्रकल्प येतो तेव्हा विरोध होतोच पण त्यांना सगळं समजावून सांगितलं पाहिजे.

यामुळं मोठं मोठे प्रकल्प कोकणात येऊनही जो आर्थिक विकास व्हायला हवा तो झालेला नाही. आपल्याकडं पेट्रोकेमिकल्स प्लान्ट म्हटलं की खूपच गवगवा होतो. तंत्रज्ञान आता खूपच अत्याधुनिक झालं आहे, त्यामुळं झिरो एक्झॉस्ट होतो. माझ्यासारखे शास्त्रज्ञ जनतेला सांगू शकतो. मी आहे, काकोडकर आहोत.

कोकण माझं आहे, कोकण श्रीमंत व्हायला पाहिजे. तुम्ही मनानं श्रीमंत व्हा, धनानं पण श्रीमंत व्हा. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आपण मंगळयान पाठवलं म्हणतो पण मुलीला मंगळ आहे म्हणून लग्न जमत नाही, असंही मानतो अशानं समाज मोठा होणार नाही, असा महत्वाचा सल्लाही यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT