Chitra Wagh
Chitra Wagh टिम ई सकाळ
महाराष्ट्र

कुचिक बलात्कार प्रकरण : मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु; चित्रा वाघ यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पुण्यातील रघुनाथ कुचिक कथीत बलात्कार प्रकरणात (Kuchik Rape Case) भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर पीडित तरुणीनं गंभीर आरोप केले आहेत. यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी चित्र वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Kuchik rape case attempts are being made to arrest me allegation of Chitra Wagh)

चित्रा वाघ म्हणाल्या, "राजकारणात रोज नवीन अनुभव येत असतात याचा अनुभव आज मलाही आला. एखादी पीडिता जर तुमच्यासमोर सगळं येऊन सांगते. ती पुराव्यानिशी तुम्हाला सांगते. मला काहीही माहिती नसताना पीडित मुलीनंच मला सगळी माहिती दिली. काल दुपारपर्यंत पीडित तरुणीनं मदतीसाठी मला मेसेज केले. ती एकटी लढत असल्याचं मला दिसून आल्यानंतर तिला मदत करायच्या भावनेतून मी तिला मदत केली. तर ही माझी चूक आहे का?"

पीडित मुलगी फेब्रुवारीपासून एकटी लढत होती तिनं सर्वांकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं पण महाराष्ट्रातील एकही महिला तिच्या मदतीला आली नाही. पण जेव्हा चित्रा वाघकडे हे प्रकरण आलं तेव्हा मात्र हे प्रकरण गंभीर बनलं. आता तर तिला सर्वजण संरक्षण देण्यासाठी तयार आहेत. याप्रकरणी आता नवा एफआयआरही दाखल होऊ शकतो. माझ्यावर ब्लॅकमेल करत असल्याचे खोटे आरोप विद्या चव्हाण करत आहेत, त्या डोक्यावर पडल्या आहेत. पण पोलिसांनी माझी चौकशी करावी मी कुठल्याही चौकशीसाठी तयार आहे, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मला एवढचं सांगायचं आहे की, माझ्यावर जे आरोप झालेत त्याची नक्कीच चौकशी करा. मी काय केलं? कुठे केलं? सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं संबंधित एजन्सीनं तपास करावा. चित्रा वाघ सर्व चौकशांसाठी तयार आहे. फक्त त्या मुलीला संरक्षण द्या आणि तिला न्यायाही मिळवून द्या. पण राज्यातील माय-माऊलींना मला सांगायचं आहे की असले प्रकार होत राहतात त्यामुळं मी तुमच्यासाठी काम करायचं थांबवणार नाही. कुणी मला चांगलं म्हणू दे किंवा वाईट म्हणू दे मला काहीहा फरक पडत नाही. कालपर्यंत आम्ही पीडितेच्या सोबत होते आणि आजही आहोत. तिला जेव्हा कधी गरज पडेल चित्रा वाघ सदैव तिच्यासोबत असेल, असंही चित्रा वाघ यांनीही म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT