Agrowon 
महाराष्ट्र बातम्या

पिकांची पेरणी, उत्पादनाच्या अचूक माहितीअभावी शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका

अनिल जाधव

पुणे - यंदा सरकारने शेतीमालाचे विक्रमी उत्पादनाचे अंदाज दिले. मात्र प्रत्यक्ष उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाचे दर वाढले. त्याचा लाभ माहितीअभावी शेतकऱ्यांना घेता आला नाही. त्यामुळे हंगामात ‘यूएसडीए’च्या पातळीवर प्रत्येक महिन्याला पेरा, उत्पादन, नुकसान, सरासरी दरपातळी, आयात आणि निर्यातीची माहिती दिल्यास शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा लाभ घेता येईल. त्यासाठी पेरा नोंदणीतील अनास्था, उत्पादन काढण्याची सदोष पद्धती बदलून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करणे आवश्‍यक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जाणकार म्हणतात...

  • कालबाह्य आणि सदोष पद्धती बदल्याव्यात
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण करावी
  • पीक कापणी प्रयोग गावपातळीवर घेऊन त्याचीही पडताळणी व्हावी
  • थेट शेतकऱ्यांकडून आकडेवारी घेणे गरजेचे
  • ड्रोन, सॅटेलाइट, जिओ टॅगिंगचा वापर करावा
  • एकाच यंत्रणेकडे पेरणी, नुकसान, उत्पादन माहिती संकलनाचे काम द्यावे

थेट शेतकऱ्यांकडून त्यांना एकरी किती उत्पादन मिळाले याची माहिती घेऊन पीककापणी प्रयोगाशी तुलना केल्यास अचूक माहिती मिळू शकते. सांख्यिकी विभागाने ही जुनी पद्धत सोडून नवी पद्धत वापरावी. 
- डॉ. प्रदीप आपटे, कृषी अर्थतज्ज्ञ

शेतकऱ्यांकडून पेरणी, उत्पादन आणि नुकसानीची माहिती घेतल्यास अचूक अंदाज काढता येतील. डेटा संकलनासाठी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर ड्रोनसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून व्यवस्था विकसित करावी लागेल. शेतकऱ्यांनीच सात-बारावर सर्व माहिती भरल्यास अचूक माहिती मिळू शकते.  
- डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT