mantralay sakal media
महाराष्ट्र बातम्या

‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; महाविकास आघाडी नेत्यांचे आवाहन

सकाळ वृ्त्तसेवा

ठाणे : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने उत्तर प्रदेशामधील लखीमपूर (lakhimpur) येथील शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे (mva government) (सोमवार) ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra bandh) हाक देण्यात आली आहे. ठाण्यातील अनेक भागांत ‘बंद’चे फलक लागले आहेत. या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या मार्गदर्शनाखाली बंद पुकारण्यात येत आहे.

ठाणेकर नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी ‘भारत बंद’चा निर्णय घेण्यात आला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारल्यामुळे आजारी रजा सोडून सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्या आहेत. प्रत्येक विभागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल, तसेच अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे विशेष पोलिस शाखेचे उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election : ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण गरम; भाजपमधील इच्छुक अस्वस्थ

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Crime News : दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा ठरला अन् लग्नाच्या दबावामुळं प्रियकरानं सीनियर नर्सची गळा चिरून केली निर्घृण हत्या, ममतानं काय धमकी दिली?

CTET Feb 2026: अपूर्ण अर्जदारांसाठी शेवटची संधी; या तारखेपासून CTET अर्ज विंडो पुन्हा सुरू

Kalyan News: धक्कादायक! १७व्या मजल्यावर क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT