Lalbaug Raja Ganesh Visarjan 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Lalbaug Raja Ganesh Visarjan : लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी

कोविडच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.

सकाळ डिजिटल टीम

कोविडच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.

Lalbaug Raja Ganesh Visarjan 2022 : दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलीय. पुणे (Pune), मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय. मुंबईत (Mumbai) लालबागच्या राजासह (Lalbaugcha Raja) मुंबईतील मोठ्या मंडळाचे बाप्पा विसर्जनासाठी निघाले आहेत. थोड्याचं वेळात त्यांचं विसर्जन होणार आहे.

कोविडच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील 10 दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली होती.

लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी

दरवर्षी लालबागच्या राजाचं (Lalbaug Raja) दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती.

यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 23 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झाली नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT