lalit patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drug Case : ललित पाटीलकडून तीन किलो सोने जप्त; पुणे पोलिसांकडून नाशिकमध्ये कसून चौकशी

२०२० मध्ये चाकण येथील एमडी ड्रग्जचा कारखाना पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त करीत ललित पाटीलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्जमाफिया ललित पाटील (पानपाटील) यास पुणे पोलिसांनी गुरुवारी (ता. २) मध्यरात्रीनंतर नाशिकमध्ये आणून शुक्रवारी (ता. ३) पहाटेपर्यंत कसून तपास करीत त्याच्याकडून तीन किलो सोने जप्त केले आहे. ड्रग्जच्या पैशांतून पाटील बंधूंनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर येते आहे.

२०२० मध्ये चाकण येथील एमडी ड्रग्जचा कारखाना पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त करीत ललित पाटीलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात तो येरवडा कारागृहात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाच्या नावाखाली तो ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता.

परंतु, त्याचवेळी तो एमडी ड्रग्जचे रॅकेटही चालवत होता. ससून रुग्णालयात ड्रग्जचा साठा पोलिसांच्या हाती लागताच पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते. सुमारे तीन आठवडे तो पोलिसांना हुलकावण्या देत बंगळूरमार्गे चेन्नईला पोहोचला. त्याच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांनी त्यास अटक केली. मुंबई पोलिसांच्या ताब्यातून गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.

पुणे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त व तपास अधिकारी सुनील तांबे हे गुरुवारी (ता. २) मध्यरात्रीनंतर दीड-दोन वाजता ललितला घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले. शुक्रवारी (ता. ३) पहाटेपर्यंत पुणे पोलिसांनी ललित यास तो पुण्यातून पलायन केल्यानंतर नाशिकमध्ये ज्या-ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी नेऊन चौकशी केली. तसेच, यातून पोलिसांच्या हाती आणखी तीन किलो सोने लागले आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. ड्रग्जच्या पैशांतून त्याने सोन्याशिवाय मालमत्तेत गुंतवणूक केली असावी, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

नावे उघड होणार का?

ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी अटक केली असता, ‘‘मला ससूनमधून पळवून लावणाऱ्यांची नावे सांगणार आहे,’’ असे म्हणाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या चौकशीतूनही काहीही समोर आले नाही. त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या चौकशीतून तरी ललित कोणाची नावे उघड करणार होता, ते समोर येईल का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात अनेक राजकारण्यांच्या नावांची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT