Hailstorm Dhule  
महाराष्ट्र बातम्या

Hailstorm Dhule : धुळ्यात जबरदस्त गारपीट! शेतकऱ्यांचे पिकं भुईसपाट

Sandip Kapde

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील खोरी टीटने भागात ही गारपीट झाली आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपासून गारपिटीसह साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.

जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्या गेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

कुषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, धुळ्यात तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT