Lata Mangeshkar demise 
महाराष्ट्र बातम्या

लता दीदींच्या अंतिम प्रवासाच्या दिवसभरातील घडामोडी पाहा...

भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. हिंदीसह ३६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. संध्याकाळी साडे सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलं होतं. (Lata Mangeshkar passed way her demise and funeral live updates)

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर हिंदू धर्मिक पद्धतीनं शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. लता दीदींचे कनिष्ठ बंधू हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी दीदींच्या पार्थिवाला मुखाअग्नी दिला.

  • लष्कराचे जवान आणि महाराष्ट्र पोलिसांकडून लता दीदींना गार्डऑफ ऑनर आणि बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली.

  • राजकीय नेते मंडळी आणि सेलिब्रेटी यांनी घेतलं लता दीदींचं अंत्यदर्शन आणि आदरांजली वाहिली.

  • पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.

  • लता दीदींचं पार्थिव शिवाजी पार्कवर पोहोचलं. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच शिवाजी पार्कवर होचणार आहेत. याठिकाणी मोठ्या संख्येनं नेते, कलाकार मंडळी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थिती लावली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर दाखल झाले असून प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे विमानतळावर पोहोचले आहेत.

PM Modi
  • दिग्गज गायिका लतामंगेशकर यांच्या स्मरणार्थ कर्नाटक सरकारने दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. "सर्व सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम बंद राहतील तसेच राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल," असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

  • गायिका लता मंगेशकरांच्या पार्थिव सोबत मंगेशकर कुटुंबीय. शासकीत इतमामत होणार अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी.

  • 'प्रभूकुंज' बाहेर पोलिसांकडून लता दीदींना मानवंदना; पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना.

गायिका लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पश्चिम बंगाल सरकार उद्या (७ फेब्रुवारी) अर्धा दिवस सुट्टी पाळणार आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी घोषणा केली आहे.

  • भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारने सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

  • नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

  • पतंप्रधान नरेंद्र मोदी ५.४५ ते ६.०० वाजेपर्यंत शिवाजी पार्कवर पोहोचतील त्यानंतर ६.१५ ते ६.३० वाजता लता दीदींवर अत्यसंस्कार पार पडतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं प्रभूकुंजवर जाऊन मंगेशकर कुटूंबियांची भेट घेतली आहे. यापूर्वी सचिननं ब्रीच कँडी येथे जावून लता मंगेशकरांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली होती. थोड़्यावेळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दीदींच्या निवासस्थानी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन आता सर्वसामान्य चाहत्यांना घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मोठी तयारी केली आहे. शिवाजी पार्कवर हे दर्शन घेता येणार आहे. आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.

  • बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी लता दीदींच्या कुटूबियांची भेट घेतली आहे. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी श्वेता बच्चन उपस्थित होत्या. आतापर्यत वेगवेगळ्या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी भेट घेतली आहे. थोड्यावेळा पूर्वी संजय लीला भन्साळी यांनी देखील मंगेशकर कुटूंबियांची भेट घेतली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मुंबईकडे होणार रवाना. स्वतः मोदींनी ट्विटद्वारे दिली माहिती

  • लता मगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेते अनुपम खेर प्रभूकुंजवर दाखल.

  • शिवाजी पार्क इथं राज्य शासनाकडून शासकीय इतमामात लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्याची तयारी सध्या सुरु आहे.

  • पेडर रोड येथील लता मंगेशकर यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलं आहे. शिवाजी पार्क य़ेथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT