SSC RESULT esakal
महाराष्ट्र बातम्या

SSC RESULT: लातूर विभागाच्या तब्बल ७० विद्यार्थ्यांनी मिळवले १०० % गुण

धनश्री ओतारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६ आहे. विशेष म्हणजे, लातूर विभागाच्या तब्बल ७० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या विभागांमध्ये लातूर विभागात तब्बल 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. मात्र, 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूरच्या एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.

औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात 18-18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहेत. यानंतर आमरावती विभागात 8 विद्यार्थ्यांनी, पुणे विभागात 8 विद्यार्थ्यांनी, तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळविले आहेत.

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल कुठे पाहाल

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून

छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT