महाराष्ट्र बातम्या

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सागर आव्हाड, नामदेव कुंभार

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. गेल्या महिन्यात सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.

सुरेखा पुणेकर यांना विधान परिषदेवर आमदार व्हायची इच्छा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कही केला होता. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. पण तेव्हापूसानच सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आतापर्यंत कलेची सेवा केली आहे. आता राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच 16 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुरेखा पुणेकर यांनी सकाळला दिली.

शेट्टींच्या जागी पुणेकर?

विधान परिषदेच्या 12 जागांची यादी राज्यपाल यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचं नाव दिलं होतं. राज्यापालांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे. त्याजागी आता सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

Nagpur Crime: विवाहित महिलेवर अत्याचार करून केले ब्लॅकमेल; खंडणीही मागितली; हुडकेश्‍वर ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Nagpur: जादुटोना करीत महिलेवर अत्याचार; ‘बनावट’ धर्मगुरूला अटक; मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष

UP: 'मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना' सुरू; शिक्षकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, काय आहेत नियम

SCROLL FOR NEXT