Thackeray vs Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : आयोगाने शिंदे गट शिवसेना असल्याचे जाहीर केले, मात्र... ; उज्ज्वल निकमांची महत्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

Thackeray vs Shinde :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत. 

उज्ज्वल निकम म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गट शिवसेना असल्याचे जाहीर केले. मात्र आयोगाने कसबा आणि चिंचवड निवडणूक होईपर्यत हा निर्णय स्थगित केला आहे. निवडणुकीनंतर त्यांचा निर्णय अमलात येईल. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. 

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ठाकरे गटाचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगाने संघटणात्मक काही विचार केला नाही. आयोगाने फक्त शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांचा विचार केला आहे. परंतु संघटना कुणाच्या ताब्यात आहे, याचा विचार आयोगाने केला नाही. यावर दोन्ही गट युक्तिवाद करतील, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

काल कपिल सिब्बल यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. शिंगे गटाचे आमदार आधी सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले. त्यांचे वर्तन चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना विलगीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना अपात्रतेशिवाय पर्याय नाही. यावर आता शिंदे गटाचा युक्तिवाद महत्वाचा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT