पुणे : नागपूर येथे माळी समाजाच्या मेळाव्यात आरक्षणासंदर्भात नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचा कळस आहे, "सामाजिक न्यायासह समता" या घटनेच्या गाभ्याला धक्का पोहचवणारे आहे, आरक्षण घेणारे फक्त सरकारी बाबूच होतात हा त्यांचा गैरसमज आहे, अशी टीका भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासप पक्षाचे प्रवक्ते प्रा. लक्षमण हाके यांनी केली आहे.
हाके पुढे म्हणाले की, राष्ट्रपती पदापासून अनेक महत्वपूर्ण पदावर आरक्षण कोट्यातून आलेल्या आमदार, खासदारांनी प्रभावशाली काम केलेले आहे, आरक्षणाचा बेसिक अर्थ समजून घ्यायला हवा, आजही फासेपारधी, कोंची कोरवी, गोल्ल, कुडमुडे जोशी या आणि अश्या अनेक भटक्या जमातीनची अजून गॅझेटला नोंदी सुद्धा नाहीत, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील अदिवासी यांना आरक्षणाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे हे जबाबदार शासन म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून, नितीन गडकरी यांची जबाबदारी असताना एका मंत्र्याने असे घटना बाह्य वक्तव्य करणे म्हणजे द्रोह ठरू शकते, आरक्षणाबाबतची संकुचित दृष्टी दिसून येते, त्यांनी एकदा भारतीय समाजव्यवस्थेचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ याचा अभ्यास करावा, स्पेशल ट्रेनिंग घ्यावे, बार्टी, सारथी, ज्योती या ट्रेनिंग सेंटर मध्ये सहभागी व्हावे, असे प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.